भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर ....पनवेल विधानसभेसाठी प्रशांत ठाकूर,उरण विधानसभेसाठी महेश बालदी यांना उमेदवारी
पनवेल विधानसभेसाठी प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी मिळाली आहे.भाजपाच्या पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केले आहेत.या यादीत विद्यमान आमदारांनाही निवडणुकीची पुन्हा संधी देण्यात आली आहे.उरण विधानसभेसाठी भाजपाकडून महेश बालदी यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पनवेल विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रशांत ठाकूर यांनी,भाजपा पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला! पनवेलकरांच्या सेवेत दाखल होत असताना आपण दाखवलेल्या या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी आणि पक्षाचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे प्रशांत ठाकूर यांनी उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले.
Post a Comment