उरणची उमेदवारी काँग्रेस पक्षाने लढवायची असा कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याकडे आग्रह ... काँग्रेस पक्षाची उरण विधानसभेसाठी जय्यत तयारी !
पनवेल- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उरण विधानसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून विधानसभा क्षेत्रातील 355 बूथ लेवल एजंट यांचे प्रशिक्षण शिबीर रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीत आज समाजमंदिर हॉल शेलघर येथे पार पडले.महाराष्ट्र प्रदेश चिटणीस नंदाताई म्हात्रे,डॉ.मोनाली कायंदे यांनी BLA ची जबाबदारी,घ्यावयाची दक्षता, EVM मशीन, VV TAP मशीन याबद्दल सविस्तर माहिती दिली व बरीच टेक्निकल माहिती सुद्धा दिली.
यावेळी उरण विधानसभा मतदारसंघातील 275 BLA तसेच काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत उरणची उमेदवारी काँग्रेस पक्षाने लढवायची असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडे केला.
Post a Comment