आठ वर्षीय मुलीवर अत्याचार ..पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. आरोपीला अटक
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः आठ वर्षीय मुलीवर
अत्याचार केल्याप्रकरणी 40 वर्षीय आरोपी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यातील पिडित मुलगी आठ वर्षाची असून तिला आरोपीने घराच्या समोरील बाजूस असणार्या बाथरूम मध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. ही घटना पनवेल शहरातील असून पीडिता आणि आरोपी दोघेही शेजारी राहणारे आहेत.याप्रकरणी पोलिसांनी 40 वर्षीय आरोपीला अटक केली.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Post a Comment