ताटातूट झालेल्या मायलेकरांची केली भेट ...कळंबोली पोलिसांचे गतिमान तपास चक्र
कळंबोली : ( दीपक घोसाळकर ) शाळा सुटल्यानंतर आई सोबत गेलेले लेकरू अचानकपणे गायब झाल्.आईबरोबरच शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक कासावीस झाले.लहान लेकरू घरापासून हरवल्याने कळंबोलीमध्ये एकच खळबळ उडाली .शिक्षक पालक मुख्याध्यापकांनी कळंबोली पोलीस ठाणे गाठल्यानंतर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी आपल्या संपूर्ण पोलीस ठाण्यातील टीमला हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी लावल्यानंतर तब्बल पाच तासानंतर मुलाचा ठावठिकाणा लागला.ताटातूट झालेल्या मायलेकरांची कळंबोली पोलिसांनी भेट घालून दिल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.कळंबोली पोलिसांनी दाखवलेल्या अतुलनीय शोध तपासकाबद्दल पालक, शिक्षक व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील यांनी कळंबोली पोलीस ठाण्याचे आभार व्यक्त केले आहेत.कळंबोलीतील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या मराठी प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या इश्वर गणेश गर्जे वय-९ वर्ष हा मंगळवारी शाळा सुटल्यानंतर सायंकाळी पाच वाजता आई सोबत घरी गेला.आईने एलआयजी मधील आपल्या घरी मुलाला नेऊन सोडल अन् दूध आणण्यासाठी म्हणून आई घराच्या बाहेर पडली.दूध घेऊन आल्यावर पाहते तर काय मुलगा घरी नसल्याने तिने इतरत्र शोधा शोध सुरू केली .आजूबाजूला नातेवाईकांकडे पाहिल्यानंतर मुलगा सापडून आल्याने आईचा जीव काळजीत पडला. याबाबतची माहिती तिने विद्यालयाचे वर्ग शिक्षक सुधाकर जैवळ यांना सांगितली. त्यांनीही याबाबतची माहिती शाळेच्या अन्य सोशल मीडियाच्या ग्रुप वर दिले आणि कोणाला सदरचा मुलगा आढळून आला तर संपर्क साधण्याचा आवाहन केले. याबाबतची माहिती कळंबोलीतील अन्य सोशल मीडियाच्या ग्रुप वरही देण्यात आली.मात्र सहा सात वाजले तरी मुलाचा ठाव ठिकाणांना न लागल्याने अखेरीस मुलाची आई अश्विनी गणेश गर्जे यांनी कळंबोली पोलीस ठाणे गाठून याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना सांगितली. त्यानंतर सदरची माहिती विद्यालयातील अन्य शिक्षकांना समजल्यावर वर्ग शिक्षक सुधाकर जैवल,शिक्षक यशवंत मोकल यांनी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांची भेट घेऊन सदरचा प्रसंग कथन केला.घटनेचे व प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्वरित पोलीस ठाण्यातील सर्व अधिकाऱ्यांना बोलावून हरवलेल्या मुलाच्या शोध कामासाठी तपास यंत्रणा सुरू करण्याचे फर्मान सोडले .त्वरित स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अन्य सहकार्यांसमवेत मुलगा जेथे राहते त्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी करून इतरत्र चौकशी केली.विविध पथके तयार करून शोधमोहीम सुरू केल्यानंतरच कळंबोलीतील करावली चौकाजवळील एका रीक्षात झोपलेल्या अवस्थेत हरवलेला मुलगा सुरक्षितपणे सापडला.क्षणाचाही विलंब न करता मुलाला कळंबोलीतील शोध पथकाने घेऊन कळंबोली पोलीस ठाणे गाठून मुलगाआईच्या स्वाधीन केला.पाच तासानंतर सापडलेल्या मुलाला आई बिलगुण अश्रूची वाट मोकळी करून दिली.
कळंबोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळेच हरवलेला मुलगा त्वरित सापडला गेला. याचे समाधान पालक शिक्षक व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील यांनी व्यक्त केले. मुलाच्या शोध मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय डफळ ,पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव, मंगेश बाचकर ,पोलीस हवलदार सचिन पवार ,पोलीस हवालदार पांडुरंग म्हस्के, पोलीस शिपाई बापूराव झोपडे , पोलीस शिपाई संदीप पवार ,महिला पोलीस हवालदार रूपाली पाटील,तसेच निर्भया पथकाने हरवलेल्या मुलाच्या शोधकामी मोलाची कामगिरी बजावली.
Post a Comment