मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’च्या लाभार्थ्यांसाठी सोमवारी फडके नाट्यगृहामध्ये विशेष शिबीर ...महापालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत-जास्त जेष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्या - आयुक्त मंगेश चितळे
पनवेल - : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 60 वर्षांवरील नागरिकांना ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा लाभ देण्याकरिता सोमवार दिनांक 09 सप्टेंबर रोजी आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये सकाळी 10.00 वाजेपासून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याठिकाणी लाभार्थ्यांच्या नोंदणी सहित वैद्यकिय प्रमाणपत्रासाठी आरोग्य तपासणीची सुविधा देखील देण्यात येणार आहे.महापालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने आयुक्तांनी केले आहे.
जेष्ठांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने' ची घोषणा केली आहे.पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सोमवार दिनांक 09 सप्टेंबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेणार आहे.या प्रमाणपत्रासाठी महापालिकेच्यावतीने जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणीची सोय देखील नाट्यगृहात करण्यात आली आहे.जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्यासाठी आवश्यक पात्रता ..
1.लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक
2.वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक
3.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
4.'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चा लाभ घेण्यासाठी कागदपत्र आवश्यक कागदपत्रासह योजनेच्या लाभासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल.
5.लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशनकार्ड
6.महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
7. महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असणं अनिवार्य) किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड
Post a Comment