महेंद्रशेठ घरत यांच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची यशस्वी ३ वर्षे ....विविध मान्यवर,पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी महेंद्रशेठ घरत यांना दिल्या शुभेच्छा
उरण - रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष,कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाला यशस्वी तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.कामगार नेते तथा काँग्रेसचे डॅशिंग नेते महेंद्रशेठ घरत यांनी २०२१ साली काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष पद स्वीकारले होते.काँग्रेसचे पद स्विकारल्यानंतर महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी प्राप्त करून दिली.काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अनेक नागरी समस्या सोडविल्या.गोरगरिबांचे प्रश्न सोडविले.कामगारांचे प्रश्न मार्गी लावले.समाजाच्या, कामगारांच्या कल्याणासाठी अनेक संप व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार केला.पदाधिकारी कार्यकर्त्यांचा नेहमी मान ठेवला.विविध कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून काँग्रेस पक्ष मजबूत केले.पक्षात तरुणांना संधी दिली.बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या.विविध शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्याची जाणीव करून दिली असे व्यक्तीमत्व असलेल्या महेंद्र घरत यांनी रायगड जिल्हाध्यक्षपदाला साजेल असे उत्तम कार्य केल्याने व जिल्हाध्यक्षपदाची यशस्वी ३ वर्षे पूर्ण झाल्याने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.महेंद्र घरत यांच्या जिल्हाध्यक्ष पदाला तीन वर्षे पूर्ण झाल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पेढे वाटत,महेंद्र घरत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
महेंद्र घरत हे सध्या इटंकचे राष्ट्रीय सचिव आहेत.कामगार क्षेत्र, सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील महेंद्र घरत यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.न्यू मेरिटाइम जनरल कामगार संघटना या कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देत हि संघटना आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्वाची भूमिका निभावत आहेत.महेंद्र घरत यांना सर्वच गोष्टीचा उत्तम अनुभव असल्याने रायगड जिल्ह्याला महेंद्र घरत यांच्या जिल्हाध्यक्ष पदाने खरा न्याय मिळाला आहे.महेंद्र घरत यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कामगिरीवर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते खूष असून महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अधिक जोमाने काम करू अशी भावना यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.
महेंद्र घरत यांच्या शेलघर येथे निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर,अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री,जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, फिशरमेन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा,ओबीसी सेल पनवेल जिल्हाध्यक्ष वैभव पाटील,पनवेल तालुका महिला अध्यक्ष योगिता नाईक,गव्हाण जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष आश्विन नाईक,इंटक युवा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लंकेश ठाकूर,जासई विभाग अध्यक्ष विनोद पाटील, विवेक म्हात्रे,अनंत ठाकूर,परशुराम म्हात्रे,राजेश ठाकूर, अंगत ठाकूर,मुरलीधर ठाकूर,नंदा कोळी,अरुण म्हात्रे,योगेश रसाळ,चंद्रकांत ठाकूर आदी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment