News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सफाई अपनाओ बिमारी भगाओ उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन जनजागृती ...पनवेल महापालिकेच्यावतीने स्वच्छ भारत आभियान

सफाई अपनाओ बिमारी भगाओ उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन जनजागृती ...पनवेल महापालिकेच्यावतीने स्वच्छ भारत आभियान

पनवेल -  : आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्यावतीने स्वच्छ भारत आभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत सफाई अपनाओ बिमारी भगाओ उपक्रम महापालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत नुकतीच पनवेलमधील 52 सोसायट्यांना भेट देऊन नागरिकांना स्वच्छतेविषयी माहिती देण्यात आली.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाई अपनाओ बिमारी भगाओ उपक्रमांतर्गत पावसाळ्यातील स्वच्छता आणि रोग नियंत्रणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या निर्देशानूसार पिल्लई आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या सहयोगातून हा उपक्रम महापालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.पावसाळ्यात जलजन्य आणि किटकजन्य रोगाचे प्रमाण वाढत असते,या रोगांशी लढा देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी सफाई अपनाओ बिमारी भगाओ उपक्रमांतर्गत पिल्लई महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागाच्या 127 विद्यार्थ्यांनी सुमारे 52 सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांना माहिती दिली. त्याचबरोबर ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, प्लास्टिकचा वस्तुंचा कमीत कमी वापर करण्याबाबत माहिती दिली.
या उपक्रमासाठी पिल्लई आर्ट,कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन वाडेर व समन्वयक किरण देशमुख यांचे महापालिकेस सहकार्य मिळाले.


बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा उपक्रमाविषयी जनजागृती ......
महापालिका कायक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जास्तीत जास्त चालना देण्यासाठी मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत महापालिकेच्यावतीने यावर्षीही ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ ही मोहिम हाती घेतली आहे. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त तथा प्रशासक श्री. मंगेश  चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा उपक्रम राबविण्यात येत आहे. सफाई अपनाओ बिमारी भगाओ उपक्रमाबरोबर पिल्लई आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी 52 सोसायट्यामधील नागरिकांना बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा उपक्रमांतर्गत नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती  दिली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment