News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

माझ्या स्वप्नातील पनवेल.... निबंध स्पर्धेत अविनाश लहासे प्रथम ....अंकुश जाधव द्वितीय, डॉ. दादा पाटील तृतीय आणि नियती पाटील,आदिती मराठे उत्तेजनार्थ

माझ्या स्वप्नातील पनवेल.... निबंध स्पर्धेत अविनाश लहासे प्रथम ....अंकुश जाधव द्वितीय, डॉ. दादा पाटील तृतीय आणि नियती पाटील,आदिती मराठे उत्तेजनार्थ

पनवेल । वार्ताहर - पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या माझ्या स्वप्नातील पनवेल या निबंध स्पर्धेत अविनाश लहासे यांचा प्रथम क्रमांक आला आहे तर द्वितीय क्रमांक अंकुश जाधव, तृतीय क्रमांक डॉ.दादा पाटील यांना मिळाला आहे,यामध्ये उत्तेजनार्थ नियती पाटील व आदिती मराठे यांना क्रमांक देण्यात आला आहे.या निबंध स्पर्धेचे परिक्षक महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे सहसंचालक,जेष्ठ साहित्यिक रोहिदास पोटे,विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी काम पाहिले.  

विजेत्या स्पर्धकांना पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त होणार्‍या समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके दिली जाणार आहेत. हा समारंभ दि.21 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता सुरूची हॉटेल, कोहिनूर टेक्निकल जवळ, पनवेल येथे होणार आहे. विजेत्या स्पर्धकांनी आपली पारितोषिके घेण्यासाठी या समारंभाप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

या समारंभासाठी लोकनेते,माजी खासदार रामशेठ ठाकूर,खगोल अभ्यासक-पंचांगकर्ते दा.कृ.सोमण, आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेंद्र दळवी,कामगार नेते महेंद्र घरत,पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,जेष्ठ साहित्यिक रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील,सुप्रसिध्द अभिनेत्री मुग्धा गोडबोले उपस्थित राहणार आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment