News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळा... मान्यवरांची उपस्थिती... पनवेलचे नाव उंचवणाऱ्या व्यक्ती आणि सेवाव्रती संस्थांचा सन्मान

पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळा... मान्यवरांची उपस्थिती... पनवेलचे नाव उंचवणाऱ्या व्यक्ती आणि सेवाव्रती संस्थांचा सन्मान

पनवेल- गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.पनवेलचे नाव उंचवणाऱ्या व्यक्ती आणि सेवाव्रती संस्थांना मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या माझ्या स्वप्नातील पनवेल.या निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत.हा सोहळा शनिवारी २१ सप्टेंबर २०२४ दुपारी ३.३० पनवेल शहरातील सुरुची बँक्वेट हॉल,सुरुची हॉटेल,कोहिनूर टेक्निकल जवळ येथे होणार आहे. 

या समारंभासाठी लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खगोल अभ्यासक-पंचांगकर्ते दा.कृ.सोमण,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेंद्र दळवी, कामगार नेते महेंद्र घरत,पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,जेष्ठ साहित्यिक रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील,सुप्रसिध्द अभिनेत्री मुग्धा गोडबोले उपस्थित राहणार आहेत,या सोहळ्यासाठी आपणही उपस्थित राहावे असे आवाहन संपादक गणेश कोळी यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment