News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

दिवसा नोकरी आणि रात्री लूटमार करणाऱ्या ५ जणांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

दिवसा नोकरी आणि रात्री लूटमार करणाऱ्या ५ जणांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल दि.१७ (संजय कदम): दिवसा नोकरी करून रात्रीच्यावेळी एक्सप्रेस महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका सराईत टोळीतील ५ जणांच्या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी अत्यंत नाट्यमय रित्या वेषांतर करून ताब्यात घेतले आहे. यांच्या अटकेमुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीसह खालापूर व परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपुरी यांनी व्यक्त केली आहे. 

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग, पुणे लेनवर ट्रक क्र एम.एच १४ के क्यु ५००८ वरील चालक फिर्यादी गेंदलाल रामगरीब पटेल (वय ३५ वर्षे रा. मध्यप्रदेश) हे लघुशंके करता पळस्पे हायवे पोलीस चौकी च्या २०० मिटर पुढे, कि.मी. ९.८, ता. पनवेल याठिकाणी थांबले असता अज्ञात ५ ते ७ इसमांनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून, हात बुक्क्यांनी मारहाण करून व जमिनिवरुन फरपटत नेवुन, जखमी करुन त्याचे कडील २ मोबाईल हॅन्डसेट व २३ हजार रुपये रोख रक्कम मारहाण करुन जबरी चोरी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच सदर दाखल गुन्हयाचा तपास पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अति. पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांच्या आदेश व सुचनांप्रमाणे तसेच पोलीस उप आयुक्त,परि. २, प्रशांत मोहिते व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांचे नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले. सदर पथकातील पोनि (गुन्हे)सतीश शेलकर, सपोनि अनुरूद्ध गिजे, पोउपनि हर्षल राजपुत, पोहवा विजय देवरे, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा महेश धुमाळ, पोहवा शिवाजी बाबर, पोहवा सतिश तांडेल, पोशि राजकुमार सोनकांबळे, पोशि आकाश भगत, पोशि भिमराव खताळ, पोहवा वैभव शिंदे, पोशि प्रविण पाटील यांनी वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्हयाचा तांत्रिक व गोपनिय माहितीद्वारे तसेच गुन्हयातील फिर्यादी ट्रक चालक याचेकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास आणि वेषांतर करून खालापूर परिसर पिंजून काढला असता गुन्हयातील एकुण ०८ आरोपींना निष्पन्न करून त्यापैकी आरोपी रोहन उर्फ गुड्डु गोपीनाथ नाईक (वय २४ वर्षे), रोहिदास सुरेश पवार (वय २३ वर्षे), आतेश रोहिदास वाघमारे, (वय २६ वर्षे,) मनिष काळुराम वाघमारे (वय ३५ वर्षे) ,शंकर चंदर वाघमारे,( वय १८ वर्षे ५ महिने) यांना सापळा लावून, शिताफीने अटक केलेली आहे. सदर गुन्हयातील इतर ३ आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना २० सप्टेंबर २०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे. या आरोपींकडून एकुण- रु. ४८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात ४१ हजार रुपयांचे ०५ मोबाईल फोन, ७ हजार रोख रक्कमेचा समावेश आहे.सदर गुन्हयातील अटक आरोपी रोहन उर्फ गुड्डु गोपीनाथ नाईक हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापुर्वी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे २ व खालापुर येथे ०१ जबरी चोरी व दरोडयाचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
पोलीस प्रशासनाकडून वरील गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरून प्रवास करणा-या वाहन चालकांनी रात्रीचे वेळी प्रवासा दरम्यान आपले वाहन ज्या ठिकाणी पोलीस चौकी किंवा अधिकृत थांबा असलेल्या अमेटी युनिव्हसिटी लगत पार्किंगचे ठिकाणी थांबावे
- सहा पोलीस आयुक्त अशोक राजपूत 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment