नवीन पनवेल येथे इनरव्हील क्लबची डिट्रिक्ट असेंबली संपन्न ... उत्कृष्ट कार्याबद्दल अनेकांचा सन्मान
पनवेल- नवीन पनवेल येथे इनरव्हील क्लबची ४० वी डिस्ट्रिक्ट असेंबली 'स्वर्णप्रभा'काकाजीनी वाडी या ठिकाणी पार पडली.यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा सुनिता जैन व डिस्ट्रिक्ट ३१३ च्या भूतपूर्व अध्यक्षा रचना मालपानी तसेच नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ.शोभना पालेकर व क्लबचे अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीला त्यांच्या विविध क्षेत्रातील सामाजिक कामांसाठी पाच ट्रॉफी व सहा सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.क्लबच्या अध्यक्षा ध्वनी तन्ना व सेक्रेटरी स्नेहल कल्याणकर यांना बेस्ट प्रेसिडेंट-सेक्रेटरीसाठीचा द्वितीय पुरस्कार तसेच क्लबच्या खजिनदार वैशाली कटारिया यांना बेस्ट ट्रेजरर साठीचा तृतीय पुरस्कार,बिजल मिरानी यांना बेस्ट आय.एस.ओ.व विजयता कोठारी यांना बेस्ट एडिटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
याबरोबरच डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स 'दिव्या'चे सफल आयोजन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल व हॅपी स्कूल प्रोजेक्ट तसेच युवाशक्ती,स्त्रीशक्ती व निसर्ग संवर्धनासाठी क्लबने केलेल्या उत्कृष्ट कार्याचा ट्रॉफीच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून ४०० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.
Post a Comment