पनवेलमध्ये ‘रॉकस्टार’ ची तुफान धमाल मस्तीडान्स शोला लयभारी प्रतिसाद
पनवेल (प्रतिनिधी) - रंगमंचावर एकाहून एक सरस नृत्य सादर करणारे कलाकार त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देणारे पालक मान्यवरांची उपस्थिती अन् त्यांच्याकडून कौतुकाची थाप अशा अतिशय उत्साही वातावरणात रॉकस्टार डान्स अकॅडमीचा धमाल डान्स शोला लय भारी प्रतिसाद मिळाला.पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कलावंतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
हल्लीच्या युगात शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये एखादा तरी कलागुण असणे आवश्यक आहे.यासाठी पालकही सजग झाले असल्याचे दिसून येते.या पार्श्वभूमीवर रॉकस्टार डान्स अकॅडमी मुलांना नृत्य क्षेत्रात व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच मुलांसहित पालकांनाही यंदाच्या डान्स शो ची प्रचंड उत्सुकता होती.यावेळी कलाकारांनी दिलखेच अदाकारी पेश करून उपस्थितांची मने जिंकली.विविध गीतांवर मुला-मुलींनी नृत्याचे सादरीकरण केले.यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात करताना आंबे मातेला वंदन करून लल्लाटी भंडार या गीतावर जोगवा नृत्याचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.विशेष म्हणजे या शोमध्ये उपस्थित कलाकारांच्या मातांनाही मंचावर डान्स करण्याची संधी अकॅडमीकडून देण्यात आली.यावेळी त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.या शोमध्ये चार वर्षांपासून ते युवावर्गापर्यंतच्या कलाकारांनी सहभाग घेऊन आपल्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते तसेच मुन्सिपल एम्पलोयी युनियन वर्किंग प्रेसिडेंट संतोष पवार,संस्कृती टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स आणि आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष रोहन पाटील, पत्रकार प्रशांत शेडगे, उद्योजग राकेश पोटे उपस्थित होते.शोचे सूत्रसंचालन अनुप चंदने यांनी केले. रॉकस्टार डान्स अकॅडमीला १६ वर्षे पूर्ण झाली असून मुंबई,पेण,पनवेल,डेरवली अशा विविध शाखा आहेत. य यशस्वी वाटचालीबद्दल प्रमुख पाहुण्यांनी अकॅडमीचे प्रमुख रोशन कांबळे व संपूर्ण टीमचे कौतुक केले.
रॉकस्टार डान्स अकॅडमीतर्फे दरवर्षी एक परीक्षा घेतली जाते.यामध्ये जे विद्यार्थी उत्तम कामगिरी बजावतात त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस दिले जाते.यंदा चार गटांमध्ये विजेते निवडण्यात आले.यातील मोठ्या गटात अनिशा रॉय प्रथम क्रमांक व ऊर्जा शाह द्वितीय, मध्यम गटात प्रथम क्रमांक प्रांजल भालेकर व औक्ष पाटणे,तर स्वान्वी पाटील द्वितीय, छोट्या गटात स्वरा पाटील प्रथम व सौम्या शेलार आणि चैत्यन्य दिवटे द्वितीय. पाच वर्षाखालील लहान गटामध्ये प्रथम क्रमांक ईशानी सिंग व आयुर्दा दरवडे तर ओवी सामेल द्वितीय क्रमांक तसेच रायझिंग सुपर डांसर चा पुरस्कार क्रिशा टेमगरे तर डांसर ऑफ द इयरचा पुरस्कार आयुष पाटील यांनी पटकावला सर्व विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.या डान्स शोनंतर एक वेगळीच ऊर्जा व अनुभूती घेऊन सर्वजण घरी परतले.
Post a Comment