प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या समस्येबाबत आयुक्त मंगेश चितळे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी घेतली भेट
पनवेल- प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या समस्येबाबत पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी भेट घेतली.
याबाबत त्यांनी निवेदन दिले त्या निवेदनात,पनवेल महानगरपालिका अंतर्गत क्षेत्रातील नोकर भरती बाबत,महानगरपालिका,मेट्रो,शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल,साफसफाई कामगार,पाणी पुरवठा विभाग यांची सांगड झालेली असून,स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलण्यात आलेले आहे तसेच महानगरपालिका क्षेत्रात नोकर भरती करताना बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याबरोबर चर्चा विनिमय करणे आवश्यक आहे तसेच पाऊस चालू झाल्या कारणाने रस्त्यांना खड्डे पडल्याने प्रवासात वाहन चालविताना नाहक त्रास सहन करायला लागतो,चेंबर जाम होणे,तलाव ओव्हरफ्लो,सांडपाणी,लाईट येणे-जाणे या समस्या आहेत.महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत गरजू व बेरोजगार नागरिकांना सवलतीपूर्वक व्यवसाय करण्याकरिता टेम्पो उपलब्ध करून रोजगार निर्मिती केली असता पनवेल महानगरपपालिकेचे कार्ड अधिकारी त्यांना व्यवसाय करू देत नाहीत.या समस्यांकरिता एक समन्वय बैठक चर्चेसाठी बोलविण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील,उपमहानगरप्रमुख प्रकाश गायकवाड,उपमहानगर संघटक सुनीत पाटील, शहरप्रमुख प्रवीण जाधव,गुरुनाथ पाटील, सूर्यकांत म्हसकर,यतीन देशमुख,युवासेना सहसचिव अवचित राऊत,माजी सरपंच करवले लहू पाटील,शिवसैनिक प्रशांत अनगुडे,सुनील पाटील,दिलीप पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment