इनरव्हील डिस्ट्रीक्ट ३१३ च्या चेअरमनपदी डॉ.शोभना पालेकर ... अभिनंदनचा वर्षाव
पनवेल - भारतातील सर्वांत जास्त सदस्य असलेल्या इनरव्हील डिस्ट्रीक्ट 313 च्या चेअरमनपदी पनवेलमधील स्त्रीरोगतज्ञ डॉ.शोभना पालेकर यांची निवड झाली आहे.पनवेलजवळील काकाजीनी वाडीच्या सभागृहात झालेल्या या समारंभासाठी संपूर्ण डिस्ट्रीक्टमधून साडेपाशेच्यावर सभासदांची उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी भारताच्या इनरव्हील असोसिएशनच्या प्रेसिडेंट व नॅशनल रिप्रेझेंटेटिव सुनिता जैन उपस्थित होत्या.
सन 2023-24 व्या डि. चेअरमन संगमनेरच्या रचना मालपाणी यांनी त्यांच्या वर्षाचा आढावा घेऊन त्यांनी व त्यांच्या कार्यकारीणी सदस्यांनी आपआपल्या कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला, संध्याकाळी डिस्ट्रीक्ट 313 च्या 77 क्लब यांनी वर्षभर केलेल्या कामाबद्दल त्यांना बक्षीसे देऊन त्यांचे चेअरमननी कौतुक केले.रात्री होस्ट क्लब,पनवेल यांनी आयोजित केलेल्या देवयानी कर्वे-कोठारी व साथीदार यांच्या उत्कृष्ट गायनाच्या कार्यक्रमावर सर्व इनरव्हील मेंबर्स थिरकल्या. हा कार्यक्रम इनरव्हील मेंबर कल्पना विलास कोठारी यांनी प्रायोजित केला होता.
गतवर्षीच्या डि.चेअरमन रचना मालपाणी यांनी 2024-25 च्या डॉ. शोभना पालेकर यांना कॉलर घालली व डॉ. शोभना पालेकर यांनी सनईच्या सुरात व टाळयांच्या कडकडाटात डि. 313 च्या चेअरमनपदाचा पदभार स्विकारला.क्लबची सभासद पुर्णिमा हळदीपूरकर हिने बनविलेल्या सोपबुके व साडी देऊन डॉ.शोभना यांनी एपी सुनिताजींना सन्मानित केले व नंतर सुनिता यांनी 2024-25 च्या सर्व डि.कार्यकारीणी सभासदांना लेबल पीन्स लावून त्यांना त्यापदी स्थापित केले.होस्ट क्लबतर्फे एपी सुनिता, डि.चेअरमन शोभना व सर्व डि. कार्यकारीणी सभासद अशा 11 जणींचा सन्मान क्लबची सदस्या सुलभा जोशी हिने प्रत्येकीच्या काढलेल्या चारकोल पेंटींगच्या फ्रेम्स देऊन करण्यात आला.प्रत्येक पेंटींग प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असे झाले होते.कलाकार सुलभा जोशी व पुर्णिमा हळदीपूरकर यांनाही क्लबतर्फ सन्मानित करण्यात आले. नवनिर्वाचित डि. चेअरमन डॉ.शोभना पालेकर यांची ओळख माजी चेअरमन रचना यांनी करुन दिल्यावर शोभना पालेकर यांनी आपले मनोगत व त्यांच्या कार्यकाळात त्यांना राबवावयाचे उपक्रम सुंदररित्या व्यक्त केले.त्यानंतर त्यांनी प्रमुख अतिथी एपी सुनिता यांची ओळख करुन दिली.सुनिता यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणाल सेलिब्रेट लाईफ अंतर्गत सामाजिक उपक्रम कसे असावेत,त्याकरीता 2024-25 सालाकरीता आंतरराष्ट्रीय स्तरावर,असोसिएशनस्तरावर व डिस्ट्रीक्ट स्तरावर कोणती उद्दीष्टे नेमून दिली आहेत व या वर्षीचा आंतरराष्ट्रीय थीमबाबत माहिती दिली,सुनिता यांच्या हस्ते डिस्ट्रीक्ट डिरेक्टरी 2024-25 व पनवेल कलबच्या स्वयंप्रभा या सोवेनिअरचे प्रकाशन यानंतर उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगीताने सोहोळ्याची सांगता झाली.संपूर्ण कार्याक्रमाचे आयोजन कन्व्हेनर मीनल टिपणीस, को-कन्टेनर स्वाती जोशी,एडीटर व को.ऑडीनेटर अॅड.सुजाता चव्हाण, अक्षता खोत, ट्रेझरर पुर्णिमा हळदीपुरकर, उर्वी पोतदार, क्लब प्रेसिडेंट वीणा मनोहर,सर्व कमिटी हेडस् व कलब मेंबर्स यांनी अत्यंत मेहनत घेऊन केले.
Post a Comment