News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

उरण कोमसापची उरण ते पंढरपूर साहित्यिक वारी .... १३ व्या साहित्यिक वारीला नढाळ येथे मान्यवरांच्या शुभेच्छा

उरण कोमसापची उरण ते पंढरपूर साहित्यिक वारी .... १३ व्या साहित्यिक वारीला नढाळ येथे मान्यवरांच्या शुभेच्छा

पनवेल- दरवर्षी रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या प्रेरणेतून उरण कोमसापची उरण ते पंढरपूर साहित्यिक वारी पंढरपूरात विठू रायाच्या दर्शनाला जाते.वारीचे हे तेरावे वर्ष आहे.
   
यावर्षी उरणहून पंढरपूरला निघालेल्या वारीला चौक जवळील पंचायतन मंदिर,नढाळ येथे मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख,अ‍ॅड.गोपाळराव शेळके, रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील, कोमसापचे केंद्रीय प्रतिनिधी श्री.गणेश कोळी,संजय गोडसे (लायन्स जॉइंट डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी) स्वाती गोडसे( माजी अध्यक्ष लायन्स क्लब पनवेल सरगम),मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष श्री.रामचंद्र म्हात्रे,उरण कोमसापचे सचिव अजय शिवकर,जिल्हा प्रतिनिधी संजय होळकर,नाटककार श्री.किशोर पाटील,श्री.नरेश पाटील,मिलिंद कांबेरे,श्री.अनंत पाटील, श्री.किशोर म्हात्रे आदी सदस्य सपत्नीक उपस्थित होते.शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, एडवोकेट गोपाळ शेळके यांनी आपल्या भाषणातून या वारीला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उरण कोमसापचे अध्यक्ष श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment