मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारार्थ ....पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने पनवेलमध्ये पथनाट्यांचे आयोजन
पनवेल- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा भगिनींना लाभ मिळावा या प्रचारार्थ पनवेलमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त बाबासाहेब राजळे,उपायुक्त संतोष वारुळे,महिला ब बालकल्याण विभागप्रमुख प्रकाश गायकवाड यांनी पथनाट्याचे आयोजन केले.
पनवेल महापालिकेच्यावतीने खांदा कॉलनी,कामोठे,कळंबोली, खारघर या ठिकाणी पथनाट्य सुरू करण्यात येणार आहेत पण आज पनवेलमध्ये कर्नाळा सर्कल,रेल्वे स्टेशन,बस स्टँड या ठिकाणी पथनाट्यांचा शुभारंभ करण्यात आला.
या पथनाट्यातून मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे महत्व त्याचबरोबर योजनेसाठी पात्र-अपात्र महिला अशी माहिती देण्यात आली.
Post a Comment