News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

इंडोनेशियामधील पर्पल राईसची पनवेलच्या गुळसुंदे गावात लागवड .... प्रगतिशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांचा शेतीप्रयोग

इंडोनेशियामधील पर्पल राईसची पनवेलच्या गुळसुंदे गावात लागवड .... प्रगतिशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांचा शेतीप्रयोग

पनवेल - पनवेल तालुक्यातील गुळसुंदे गावातील प्रगतिशील शेतकरी,कृषीभूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये पर्पल राईस म्हणजेच इंडोनेशियातील थायोमल्ली जस्मीन भाताची लागवड केली आहे.हा तांदुळ विशेषतः लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. 

गुळसुंदे येथील प्रगतिशील शेतकरी महाराष्ट्र राज्य कृषीभूषण मीनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करुन आत्तापर्यंत अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने घेतलेली आहेत,ज्यामध्ये ड्रॅगनफ्रुट,स्ट्रॉबेरी, लालतांदुळ,काळा तांदुळ, बासमती,आंबेमोहर, डायबेटीससाठीचा आरएनआर तांदुळ,कलर कलिंगड व मस्कमेलन इत्यादीचा त्यात समावेश आहे.
आपल्याकडे यशस्वी झालेले उत्पादन इतरही परिसरातील शेतकर्‍यांनी घ्यावे यासाठी त्यांचा सतत प्रयत्न चालू असतो जेणेकरुन पारंपारिक पिकांबरोबर नाविन्यपूर्ण उत्पादने घेतल्यास शेतकर्‍यांचा अर्थिकस्तर उंचावेल.


यावर्षी मीनेश गाडगीळ यांनी नीळा तांदुळ इंडोनेशियातील, थायोमल्ली जस्मीन राईस जो लहामुलांसाठी विशेष करुन उपयुक्त व परपल राईस लेबेनिया येथील आपल्या शेतात लागवड केलेला आहे.
साधारण 30 ते 40 क्विंटल एकरी उत्पादन देणार्‍या या जाती असून अनेक गुणधर्म या तांदुळात आढळून येतात ज्यामध्ये कमी ग्लॅयसेमिक इन्डेक्स, अ‍ॅन्टी ऑक्सीडन्ट इफेक्ट, अ‍ॅन्टी कॅन्सर इफेक्ट, विशेष प्रकारचा सुवास, शिजण्यासाठी कमी कालावधी इत्यादी व नैसर्गिक पिग्मेंटमुळे येणार्‍या विविध रंगामुळे ग्राहकाची यास विशेष पसंती असल्याचे निदर्शनास आले आहे.वरील तांदुळ हा कोकणात पहील्यांदाच घेतला गेला असून पर्पल राईस हा राज्यात पहिल्यांदाच तयार होइल व पीक तयार झाल्यानंतर वरील जातींचे बीयाणे तयार करुन ते आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्‍यांना आपण उपलब्ध करुन देऊ असा आशावाद मीनेश गाडगीळ यानी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment