पनवेल महानगरपालिकेच्यावतीने प्लास्टिक विरोधी कारवाई... ३७ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त,२१ हजाराचा दंड वसूल
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिकेच्या खारघर,कळंबोली, कामोठा या तीन प्रभागांमध्ये आज प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली.यामध्ये सुमारे 37 किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला तसेच सुमारे 21 हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज मोठी प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात आली.यामध्ये प्रभाग समिती अ खारघर प्रभागामध्ये रेल्वे स्टेशन येथे परिसरात प्लास्टिक पिशवी (सिंगल युझ प्लास्टिक) बंदी कारवाई दरम्यान रु ५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला , या कारवाईमध्ये सुमारे ५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
प्रभाग समिती ‘ब’ कलंबोली प्रभागामध्ये आज प्रभाग क्रमांक ९ आणि प्रभाग क्रमांक १० कळंबोली येथील भाजी मार्केट,फळ विक्रेते व हॉटेल व्यावसायिक यांच्यावरती प्लास्टिक पिशवीबंदी (सिंगल युझ )कारवाई करण्यात आली,या कारवाईमध्ये अंदाजे १० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व 11 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत कामोठा - कलंबोली विभागाच्या माध्यमातून आज खांदा कॉलनी वार्ड 14 व 15 येथील भाजी मार्केट व फळ विक्रेते व हॉटेल यांच्यावरती प्लास्टिक पिशवी ( सिंगल युझ ) बंदी कारवाई करण्यात आली,या कारवाई मध्ये अंदाजे 22 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले, व 5 हजार दंड वसूल करण्यात आला. सदर ठिकाणी मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड व स्वच्छता निरीक्षक , पर्यवेक्षक व स्वच्छता दूत उपस्थित होते.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकवरती प्रतिबंध करण्यात आला आहे.उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या यांच्या सूचनेनुसार प्रतिबंधित प्लास्टीकची साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे तसेच सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 नियम 4(2) अन्वयानुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकचे उत्पादन,आयात, साठवण,वितरण विक्री आणि वापरांवर बंदी करण्यात आली आहे.
प्लास्टिक विरोधी कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर ५ हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर १० हजार रुपये ,तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर २५ हजार रूपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असणार आहे.
Post a Comment