News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कळंबोलीत २० वर्षे वयाच्या ५ झाडांचे यशस्वी पुनर्रोपण .... समाजसेवक आत्मारामशेठ पाटील यांचा अभिनव उपक्रम

कळंबोलीत २० वर्षे वयाच्या ५ झाडांचे यशस्वी पुनर्रोपण .... समाजसेवक आत्मारामशेठ पाटील यांचा अभिनव उपक्रम

कळंबोली (दीपक घोसाळकर ) : कळंबोली वसाहतीमधील बारकूबाई नामदेव पाटील शिक्षण संस्थेच्या शाळेच्या आवारात वीस वर्षे वयाचे असलेली मोठी झाडे हे बांधकाम करत असताना अडसर ठरत होती.या झाडांना मुळापासून न तोडता या झाडांचे यशस्वी पुनर्पण करून या झाडांना पुन्हा जीवदान दिले आहे.कळंबोलीतील ज्येष्ठ समाजसेवक व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्मारामशेठ पाटील यांनी फळे व सावली देणाऱ्या पाच झाडांना जीवदान दिले आहे.त्यांच्या या पर्यावरण प्रेमी गोष्टीचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

झाडे लावा झाडे जगवा चा नारा नेहमीच सर्वच ठिकाणी दिला जातो.मात्र प्रत्यक्षात काँक्रीटच्या जंगलात असलेली झाडे तोडून नष्ट करण्याचा सपाटा लावण्यात आल्याचे आपण सर्वजण पाहत आहोत.रोडपालीतील बारकूबाई नामदेव पाटील शिक्षण संस्थेच्या शाळेच्या आवारात नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना जांभूळ बदाम जातीची फळ व सावली देणारी ही पाच झाडे बांधकाम क्षेत्रात अडसर ठरत होती . दौलदार पसारा फुलवलेल्या वीस वर्षे वयाची झाडे तोडून नष्ट न करण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक व संस्थेचे अध्यक्ष आत्मारामशेठ पाटील यांनी घेतला.यासाठी उद्यान विभागातील व वनविभागाच्या जाणकारा कडून झाडांचे रोपण करण्या बाबत माहिती घेतली तसेच खोल जमिनीत मुळे रुजलेल्या झाडांचे पुनर्पण कसे करायचे तेही झाडांची मुळे न तुटता याबाबतची सखोल माहिती  घेतली.त्याकरता हिरवेगार फांद्या असलेल्या झाडांच्या बाजूची माती दहा ते बारा फूट खोल जाऊन सभोवताली करून मोकळी करण्यात आली. तेवढ्याच खोलीचे व रुंदीचे खड्डे शाळेच्या आवारातील अन्य भागात खणून तयार करून ठेवले.रोपण करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात कृत्रिम व रासायनिक खते,शेणखत टाकून काढण्यात आलेल्या झाडांच्या मुळना जीवदान देणारे पोषक वातावरणही तयार करण्यात आले.खोलवर मुळे असलेली मोठी झाडे उचलण्यासाठी हायवा क्रेनची मदतही घेण्यात आली.झाडांची मुळे व त्या बाजूची माती पूर्णपणे काढल्यानंतर मोठ्या दनकट पट्टा व रस्सीने झाडे बांधून क्रेनच्या साह्याने अलगद मुळा ना कोणतीही इजा न पोहोचता उचलून खोदलेल्या खड्ड्यात घालून त्याचे पुनर्रपण करण्यात आले.लावण्यात आलेल्या झाडांना मोठ्या प्रमाणावर मातीचां भरणा करून झाडे कलडणार नाहीत याचीही काळजी घेण्यात आली.पावसाचां हंगाम असूनही पाऊस पडत नसल्यामुळे लावण्यात आलेल्या झाडांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा माराही करून माती दाबण्यात आली.त्यामुळे लावण्यात आलेली झाडे निश्चितच पुनररूपण करून पुनर्जीवित होणार असल्याचा ठाम विश्वास हा ज्येष्ठ समाजसेवक आत्माराम शेठ पाटील यांनी व्यक्त केला आहे. पर्यावरणाबाबत असलेले त्यांचे हे प्रेम त्यांनी वीस वर्षे वयाच्या पाच झाडांचे पूर्णरूपण करून दाखविल्याने त्यांचे सर्व स्तरातूनच अभिनंदन केले जात आहे.

शाळेच्या आवारात नवीन इमारतीचे बांधकाम करीत असताना २० वर्षांपूर्वी लावण्यात आलेले जांभूळ व बदामाची ५ झाडे  तोडून नष्ट करणे मनाला पटण्यासारखे नव्हते.त्यामुळे या झाडांचे पुनरोपन करून झाडांना जीवदान देण्याचे ठरविले.या कामी पर्यावरण प्रेमी व सखोल माहिती असणाऱ्यांची मदतही घेतली .यशस्वी पुनर्ररोपण करून वीस वर्षे वयाची पाच  झाडांना जीवदान दिल्याने मनाला आत्मिक समाधान मिळत आहे.
आत्मारामशेठ पाटील ,
ज्येष्ठ समाजसेवक,कळंबोली

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment