News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नैनाची पनवेल भागातील ७४ अनधिकृत फलकांविरुद्ध कारवाई ...पळस्पे फाटा,मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग,पनवेल-माथेरान रोड येथे कारवाई

नैनाची पनवेल भागातील ७४ अनधिकृत फलकांविरुद्ध कारवाई ...पळस्पे फाटा,मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग,पनवेल-माथेरान रोड येथे कारवाई

पनवेल  -सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित (नैना) क्षेत्रातील 94 गावांमध्ये बेकायदेशीर व अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर (होर्डिंग्ज) धडक कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली असून 74 फलक काढून टाकण्यात आले आहेत तसेच या कारवाईविरुद्ध मा. मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या जाहिरात कंपन्यांच्या याचिका फेटाळून लावताना नैना क्षेत्रामध्ये जाहिरात फलक उभारण्यासाठी सिडकोची परवानगी घेण्याबाबतचे आदेशही मा.उच्च न्यायालयाने दिले आहेत.या संदर्भात सिडकोने यापूर्वी जाहीर सूचना प्रसिद्ध करून अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याचे आवाहन संबंधित फलकधारकांना केले होते. तसेच संबंधित फलकधारक/जाहिरात संस्था यांना अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याबाबत एमआरटीपी कायद्याच्या कलम 53(1) अंतर्गत नोटीसीही बजावण्यात आल्या होत्या.

सिडकोतर्फे रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील 92 व उरण तालुक्यातील 2 याप्रमाणे 94 गावांतील अधिसूचित क्षेत्रामध्ये नैना शहर विकसित करण्यात येत आहे. नैना क्षेत्राकरिता सिडको विशेष नियोजन प्राधिकरण आहे.नैना विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम 30 प्रमाणे नैना क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोच्या बांधकाम परवानगी विभाग, नैना यांना आहेत.
अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्यासंदर्भातील जाहीर सूचना 24 मे 2024 रोजी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्यात येऊन अनधिकृत फलकधारकांना फलक काढून टाकण्यासाठी 24 तासांचा अवधी देण्यात आला होता तसेच संबंधित फलकधारकांना सदर होर्डीग्ज काढून टाकण्यासाठी एमआरटीपी अंतर्गत नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या.हा कालावधी उलटून गेल्यानंतर सिडकोतर्फे नैना क्षेत्रातील पळस्पे फाटा, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग, पनवेल-माथेरान रोड येथे कारवाई करण्यात येऊन 74 अनधिकृत फलक काढून टाकण्यात आले. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment