News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महाराष्ट्र शासनाकडून अ‍ॅडव्होकेट्स अकॅडमीकरीता तळोजा येथे भूखंड....बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांनी ताबा स्वीकारला

महाराष्ट्र शासनाकडून अ‍ॅडव्होकेट्स अकॅडमीकरीता तळोजा येथे भूखंड....बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांनी ताबा स्वीकारला

पनवेल (वार्ताहर) - ः महाराष्ट्र शासनाकडून अ‍ॅडव्होकेट्स अकॅडमीकरीता तळोजा एमआयडीसी,पनवेल येथे ८००० चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड देण्यात आलेला आहे.त्या भूखंडाचा ताबा आज बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांनी स्वीकारला.सदरवेळी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अ‍ॅड.आशिष देशमुख,बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड.संग्राम देसाई, सेक्रेटरी श्री.प्रवीण रणपिसे आणि पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.मनोज भुजबळ,पनवेल वकील संघटनेचे सदस्य अ‍ॅड.भूषण म्हात्रे आदी उपस्थित होते.सदर अकॅडमी सर्व वकिलांच्या विशेषतः युवा वकिलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरणार असल्याने सदर भूखंड  वितरित करून घेतल्याबद्दल बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी यांचे  पनवेल वकील संघटनेच्यावतीने अध्यक्ष अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी आभार मानले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment