News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी आज आयुक्तपदाचा पदभार स्विकारला... विभागप्रमुखांच्या बैठकित वेगाने कामे करण्याचा आयुक्तांच्या सूचना

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी आज आयुक्तपदाचा पदभार स्विकारला... विभागप्रमुखांच्या बैठकित वेगाने कामे करण्याचा आयुक्तांच्या सूचना

पनवेल : कल्याण –डोंबिवलीच्या अतिरीक्तपदावरती कार्यरत असणारे श्री.मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, आज त्यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. पनवेलकरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या,जोरदार स्वागत केले.

पनवेल नगरपरिषदेचे पनवेल महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्यामध्ये श्री मंगेश चितळे यांचे मोठे योगदान राहीले आहे. यावेळी त्यांनी पाणी प्रश्न व रस्ते क्राँकीटीकरण,उद्यानांचे सुशोभिकरण करून पनवेल स्वच्छ व सुंदर करण्यावरती त्यांनी भर दिला होता. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर काही काळ उपायुक्त म्हणूनही त्यांनी याठिकाणी काम पाहिले आहे. त्यानंतर बारामती येथे मुख्याधिकारी, नगरविकास विभाग, पुणे पालिकेमध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. 
महानगरपालिका क्षेत्रामधील  नागरी सुविधा अंतर्गत 29 गावांमधील अंतर्गत विकास कामे, स्वच्छता अभियान, पनवेल शहरातील पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेली  झोपडपट्टी धारकांची पुनर्वसन योजना, सिडकोकडून महानगरपालिकेला होणारे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक भूखंडांचे हस्तांतरण, पनवेल महापालिकेचे स्वराज्य मुख्यालयाचे काम ,  ई सेवा सुविधा सुरू करण्यास प्राधान्य असणार आहे.

 आयुक्तांनी  घेतली विभाग प्रमुखांची बैठक, सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या कामाचा घेतला आढावा

आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे यांनी तातडीने विभाग प्रमुखांची बैठक घेतली. येत्या दिवसांमध्ये सर्व विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागात सुरू असलेल्या कामाचे सादरीकरण व भविष्यात राबविण्यात येऊ शकणाऱ्या योजना याबाबत माहिती देण्यास सांगितले. तसेच लोकाभिमुख प्रशासन राबविण्याच्या दृष्टीने महापालिकेत ई सुविधा राबविण्याबाबत उपस्थितांना सूचना दिल्या. 

 आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मान्सुनपूर्व सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला. यामध्ये पाणी तुंबणारी ठिकाणे, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ट्रान्झिट कॅम्पची तयारी, संभाव्य धोके ओळखून दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना, या अनुषंगाने  येणाऱ्या विविध कामाचा आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला.
दिव्यांग विभाग,समाजकल्याण विभागातील विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्यासाठी आराखडा बनविण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित विभागास यावेळी दिल्या.महापालिकेचा विकास करताना सर्वांनी मिळून वेगाने कामे करावी अशा सूचना आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment