कोकण पदवीधर निवडणूक.... भाजपाचे निरंजन डावखरे आज अर्ज भरणार.....कोकण भवनमध्ये भाजपाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार
ठाणे (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाच्यावतीने आमदार निरंजन वसंत डावखरे यांच्याकडून आज शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरण्यावेळी भाजपाच्या प्रमुख लोकप्रतिनिधींबरोबरच कोकणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजपाचे निरंजन डावखरे यांच्याकडून केले जात आहे. भाजपाने यंदाही त्यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यांची विजयानंतर हॅट्रीक होणार आहे. त्यादृष्टीकोनातून भाजपाकडून कोकण पदवीधर मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.आतापर्यंत २ लाख १४ हजार मतदारांची नोंदणी झाली असून, भाजपाकडून शहरांबरोबरच गावा-गावांमध्ये संपर्क साधण्यात येत आहे.कोकण विभागीय आयुक्तांच्या कोकण भवन (बेलापूर) येथील कार्यालयात निरंजन डावखरे यांच्याकडून शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेअकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.यावेळी भाजपाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि कोकणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment