शिवसेनेचा वर्धापनदिन ..... महिला आघाडीच्यावतीने जीवन ज्योत वृद्धाश्रमाला दिली भेट ..पावसाळ्यातील आवश्यक कपड्यांचे वाटप
पनवेल (वार्ताहर) ः शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पनवेल शहर महिला आघाडीच्यावतीने नवीन पनवेल येथील जीवन ज्योत वृद्धाश्रम येथे भेट देवून त्यांच्याशी हितगुज केले तसेच त्यांना आपुलकीची भेट सुद्धा दिली.शिवसेनेचा ५८वा वर्धापनादिनाचे औचित्य साधून महिला आघाडीच्या पनवेल शहर संघटीका सौ.अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, विभाग संघटक सौ.अश्विनी देसाई यांच्या अल्पावधीतच ठरलेल्या सामाजिक बांधिलकीच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.जीवन ज्योत वद्धाश्रम नवीन पनवेल येथे सदिच्छा भेट दिली.सध्या १०आज्जी- आजोबा तिकडे वास्तव्यास आहेत.(काही जण कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने पिडीत आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी कुणीही नाही),तर काही जणांना मुलं फसवणूक करुन सोडून गेलेली आहेत. त्यांच्या बरोबर शिवसेना महिला पदाधिकार्यांनी संवाद साधला.ज्या व्यक्ती बोलू शकतात,त्यांनी आम्ही इकडे आनंदी आहोत अशी भावना व्यक्त केली.स्वच्छता निटनेटकेपणा जाणवला. व्यवस्थापकांना विचारुन पावसाळ्यात लागण्यार्या आवश्यक कपड्यांचे वाटप केले.यावेळी संस्थेच्या संचालिका श्रीदेवी सुभाष मुसणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सौ.अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, (शहर संघटिका),सौ.उज्ज्वला गावडे, (उपशहर संघटीका,) सौ.अश्विनी देसाई, (विभाग संघटीका), श्रीमती माधवी त्रिवेदी (उपविभाग संघटीका) उपस्थित होत्या.
Post a Comment