पनवेलमध्ये हौशी गायकांसाठी कराओकेचे व्यासपीठ
पनवेल - हौशी कलाकारांसाठी पनवेलमधील इव्हेंट कंपनी अॅडव्हेंचर एंटरटेन्टमेंटने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. ज्यांना गायनाची आवड आहे अशा कलाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.गेल्या 4 महिन्यात त्यांनी पाच शो केले आहेत.या उपक्रमाला कलाकारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पनवेल, उरण, ठाणे, पुणे, उलवे, ऐरोली, लोधिवली, पेण, रसायनी, तळोजा या ठिकाणांहून कलाकार या कार्यक्रमासाठी हजेरी लावत आहेत.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय खांबेकर अगदी खास शैलीत करतात. तर जागृती देशपांडे यांचे नियोजनही अगदी सुरेख असते. समस्त कलाकारांना ही संकल्पना अतिशय आवडलेली असून येथे येणारा प्रत्येक कलाकार या कंपनीला धन्यवाद देताना दिसतो.हौशी कलाकारांमध्ये स्टेज डेअरींग यावे व कलाकार पुढे जावा ही यामागची भावना असल्याचे कंपनीचे संचालक मंगेश देशपांडे यांनी सांगितले.
Post a Comment