दिशा व्यासपीठाच्यावतीने आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ... सामाजिक बांधिलकी जपत दिशाचा शैक्षणिक उपक्रम
पनवेल -दिशा व्यासपीठाच्यावतीने आदिवासी पाड्यांवर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.कर्जतजवळील पिंपळपाडा हा आदिवासी भाग आहे या पाड्यातील शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत 23 मुले -मुली शिक्षण घेतात.या विद्यार्थ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपून कर्तव्य म्हणून दिशा व्यासपीठाच्या या नियोजनासोबत नेहमीच समाजभान जपणार्या धीरज स्नेह उपहारच्या इंदू झा व अमित पाटील यांच्या विशेष सहकार्याने प्रत्येकी मुलांना शाळेची बॅग व छत्रीचे वाटप करण्यात आले तसेच मुलांना खाऊ ही देण्यात आला.सामाजिक भान जपणार्या इंदू झा यांनी मुलांना शुभेच्छा देत शिक्षणासाठी कुणाला अडचण येत असेल तर त्या नेहमी मदतीस तत्पर असतील असे आश्वासनही त्यांनी दिले.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यासाठी लागणारी बक्षिसे व शैक्षणिक साहित्य दिशा व्यासपीठाकडून पुरवले जाईल अशी ग्वाही दिशा व्यासपीठाच्या उपाध्यक्षा विद्या मोहिते यांनी दिली.यावेळी दिशा व्यासपीठाच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी मुलांशी संवाद साधल्यानंतर प्रतिकूल परिस्थिवर मात करत उचित ध्येय व जिद्दीच्या जोरावर ही मुलं उद्याच उज्ज्वल भविष्य नक्की घडवतील अशी आशा व्यक्त केली.यावेळी शाळेचे शिक्षक आशिष सर, गावडे सर व दिशा व्यासपीठाच्या रेखा ठाकूर व तनया आंधळे उपस्थित होते.
Post a Comment