पनवेलमध्ये मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर ...श्री नवनाथ मंदिर सभागृहात २७१ रुग्णांची तपासणी
पनवेल (वार्ताहर) ः माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान,ज्योविस आयुर्वेदा हॉस्पिटल,नारी सामाजिक संस्था दादर (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री नवनाथ भक्त मंडळ - पनवेल यांच्या सहकार्याने येथील श्री नवनाथ मंदिर सभागृहात मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर घेण्यात आले.या शिबीराचा 271रुग्णांनी लाभ घेतला.
डॉ.राज सातपुते आणि श्री नवनाथ भक्त मंडळाचे विजय पानसरे यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.मंडळाचे अध्यक्ष अरूण डांगे यांनी दीप प्रज्वलन केले.यावेळी डॉ.ज्योती सातपुते, मंडळाचे पदाधिकारी नंदकुमार मांढरे,संतोष कुंभार,प्रतिष्ठानचे खजिनदार विजय मांडे,सचिव मनिषा सुर्वे,विजय सातपुते, अजय सातपुते, वसंत ठाकूर आदी उपस्थित होते.मंडळाचे अध्यक्ष अरूण डांगे यांनी उपस्थिताचे स्वागत केले. मंडळाचे खजिनदार विजय पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात डाॅ. राज सातपुते यांच्यासह 15 डॉक्टरांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. यावेळी रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात आले. ए टी एस ंच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी शिबिराला भेट दिली.मनिषा सुर्वे यांनी आभार मानले.
श्री नवनाथ भक्त मंडळाचे प्रशांत भट, नितेश जाधव , विशाल कावळे,भुषण मांढरे,पोपट जाधव,अभिषेक शिंदे, हर्षल डावलेकर,गणेश कराले, प्रसाद नलावडे,राजेश तुपे तसेच वसुधा ठाकूर,शलाका नाईक,शलाका गरूड,वैशाली ठाकरे, महेश क्षीरसागर आदींनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment