मुसळधार पावसामुळे कळंबोली वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी तुंबले पाणी
पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः गेल्या काही तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कळंबोली वसाहतीसह इतर अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे प्रकार घडले आहेत.यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे.पावसाने आता जोर पकडण्यास सुरूवात केली असून पहाटेपासून पनवेल परिसरात चांगलाच मुसळधार पाऊस पडत आहे.या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे.त्यातच कळंबोली वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात साठले आहे.यातून मार्ग काढताना वाहन चालकांसह आबालवृद्धांना चांगला त्रास होत आहे तर काहींनी या पडणार्या पावसात भिजण्याचा आनंद सुद्धा लुटला आहे.
Post a Comment