एक आक्रमक नेता हरपला ... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे निधन
पनवेल - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नेरूळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे.शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा प्रभारी तसेच नवी मुंबई,पनवेल,रत्नागिरी,सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत होते.प्रशांत पाटील यांच्या जाण्याने एक आक्रमक चेहरा हरपला तसेच एक चांगला सहकारी गमावल्याचे दुःख महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
Post a Comment