News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

धबधब्यावर अडकलेल्या ९ मुलांची सुखरूप सुटका ...खांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाचे यशस्वी प्रयत्न .. वर्षा सहलीसाठी येताना कुटुंबीय, महाविद्यालयाला माहिती द्यावी- पोलिसांचे आवाहन

धबधब्यावर अडकलेल्या ९ मुलांची सुखरूप सुटका ...खांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाचे यशस्वी प्रयत्न .. वर्षा सहलीसाठी येताना कुटुंबीय, महाविद्यालयाला माहिती द्यावी- पोलिसांचे आवाहन

पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील आदई येथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या 9 तरुणाईंचा जीव खांदेश्‍वर पोलिसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी वाचविला आहे.मुंबई परिसरातील काही महाविद्यालयीन विद्यार्थी त्यामध्ये 8 मुली व 1 मुलगा साधारण 18 ते 20 वयोगटातील हे आज सकाळी तालुक्यातील पनवेल-माथेरान रस्त्यावरील आदई गावाजवळ असलेल्या धबधब्यावर वर्षा सहलीसाठी आनंद लुटण्यासाठी गेले असताना तेथून खाली उतरताना या विद्यार्थ्यांना मार्ग निसटता असल्यामुळे त्यांच्या जीवावर बेतले होते.यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या तरुणाईंचा जीव धोक्यात असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ अग्नीशमन दल व खांदेश्‍वर पोलिसांना याबाबत माहिती दिली.तातडीने त्यांची पथके सदर ठिकाणी येवून त्यांनी या 9 जणांना रेस्न्यु करून डोंगरावरुन सुखरुप खाली उतरविले तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. 

यामध्ये साक्षी चेतन दर्जी,युक्ती धर्मेंद्र पटेल, हेमंत केतन शर्मा, लय प्रशांत गोपर (सर्व रा. भाईंदर) अशी चौघांची नावे आहेत.याच दरम्यान कोन इंडियाबुल्स येथील देखील काही तरुण-तरुणी डोंगर परिसरात गेले होते.त्यांना देखील खाली आणण्यात आले. यावेळी खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रकाश ओंबासे यांच्यासह अग्निशामक दलाचे प्रशांत कुंडलिक दरेकर, अग्निशमन प्रणेता, वैभव खंडागळे अग्निशमन प्रणेता, नवनाथ आंधळे  यंत्र चालक, संतोष पड्याळ अग्निशामक, भूषण पाटील अग्निशामक, योगेश शिंदे अग्निशामक, दिग्विजय धुमाळ अग्निशामक उपस्थित होते.वर्षा सहलीसाठी येताना तरुणांनी त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून यावे तसेच या संदर्भातील माहिती आपल्या कुटुंबियांना तसेच महाविद्यालयाला द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment