पनवेल तालुक्यासह रसायनी,खालापूर,चौक,कर्जत व नेरुळ या ठिकाणी केलेले गुन्हे व त्यासाठी वापरलेल्या दोन मोटार सायकल असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत .... पनवेल तालुका पोलिसांची कामगिरी
पनवेल (संजय कदम) ः एक्सप्रेस महामार्गावर लुटमार करणार्या 5 सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी गोपनीय बातमीदाराद्वारे ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पनवेल तालुक्यासह रसायनी,खालापूर, चौक,कर्जत व नेरुळ या ठिकाणी केलेले गुन्हे व त्यासाठी वापरलेल्या दोन मोटार सायकल असा मिळून जवळपास 5 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उदयविर श्रीवास्तव ट्रक चालक हा व त्याचा सहकारी हे त्यांच्या ताब्यातील वाहन घेवून टायरमधील हवा चेक करण्यासाठी पनवेल तालुक्यातील मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पळस्पे हायवे ट्रॅफिक चौकीजवळ पहाटेच्या सुमारास थांबले असताना अचानकपणे आलेल्या चार अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करून त्याला व त्याच्या सहकार्याला हाथा बुक्क्यांनी मारहाण करून तसेच त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला जखमी केले होते व त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम चोरुन नेला होता.याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करताच वपोनि अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश फुले, गुन्हे विभागाचे सपोनि संजय गळवे,पो.हवा.विजय देवरे,महेश धुमाळ,सुनील कुदळे, पो.शि.आकाश भगत आदींचे पथक सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखेचे गुन्हे शाखेचे सपोनि संजय गळवे यांना खास बातमीदाराकडून या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली त्यानुसार या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपी विशाल जाधव (27), स्वप्नील वाघमारे (20), सौरभ वाघमारे (25), रितेश पवार (21),अमित वाघमारे (20) व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवून बोलते केले असता ते सराईत गुन्हेगार निघाले व त्यांनी आतापर्यंत या गुन्ह्यासह रसायनी,खालापूर,चौक,कर्जत व नेरुळ या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यानुसार त्यांच्याकडून आतापर्यंत 2 लाख 31 हजार रुपये किंमतीचे 21 मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन पल्सर मोटार सायकल असा मिळून जवळपास 5 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींचा शोध गुन्हे शाखेचे सपोनि संजय गळवे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे लागला आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे तसेच पुढील तपास व इतर आरोपींचा शोध सपोनि निलेश फुले करीत आहेत.
Post a Comment