पनवेल महानगरपालिका,सिडको, ग्रामपंचायती,तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने या भागातील २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार ... गुरुवारी रात्री बारापासून ते शुक्रवारी रात्री बारावाजेपर्यंत असा कालावधी
पनवेल-पनवेल महानगरपालिका,सिडको, ग्रामपंचायती,तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने या भागातील २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असून हा कालावधी गुरुवारी रात्री बारापासून ते शुक्रवारी रात्री बारावाजेपर्यंत असा असणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रातील बारवी गुरुत्ववाहिनीवर तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने गुरुवार दि.२७ जून २०२४ रात्री बारा वाजता ते शुक्रवार दि.२८ जून २०२४ रात्री बारा वाजेपर्यंत असा एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.यामध्ये पनवेल महानगरपालिका,सिडको,ग्रामपंचायती,तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने या क्षेत्राचा समावेश असेल.तरीही सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, त्याचप्रमाणे ग्राहकांनी वरील कालावधीमध्ये मुबलक पाणीसाठा करून ठेवावा तसेच तदनंतर पुढील काही कालावधीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.सदर बाब जनता,स्थानिक संस्था,ग्रामपंचायत,सिडको, महानगरपालिका,उद्योजक व पाणीपुरवठ्याचे इतर ग्राहक यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे.मंडळास सहकार्य करण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
Post a Comment