आपला एअरपोर्ट आपला रोजगार अंतर्गत विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे पनवेलमध्ये आयोजन ... जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा उपक्रम
पनवेल - जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्यावतीने आपला एअरपोर्ट आपला रोजगार अंतर्गत विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिरामुळे विमानतळ क्षेत्रात शेकडो विभागामध्ये हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.ज्यामध्ये दहावी पासपासून ते ग्रॅज्युएशन सोबतच विविध विमानतळ क्षेत्रासंबंधित आवश्यक असलेले कोर्स केलेले जे तरुण असतील त्यांना या संधीचा फायदा होणार आहे.
विमानतळ प्राधिकरण क्षेत्रातील रोजगार संदर्भात हे उचललेले पहिले पाऊल आहे,यापुढे विविध विभागातील नोकरीच्या संधी मिळण्यासाठी शिबीर आयोजित केले आहे.
विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिर ....
दिनांक:- 16 जून 2024
ठिकाण:- व्ही. के. हायस्कूल,पनवेल.
वेळ:- सकाळी 10:00 ते 1:00
सूचना:-
1) शिबिरात मुंबई एअरपोर्ट येथे पॅसेंजर सर्विस एक्झिक्यूटिव्ह आणि ज्युनिअर कस्टमर सर्विसेस एक्झिक्यूटिव्ह पदांसाठी भरती मुलाखती दरम्यान काय पूर्व तयारी करावी याचे मार्गदर्शन होईल.
2) बैठक व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा प्रकारे असेल.
3) शिबिर हे तरुणांच्या रोजगार मार्गदर्शनासाठी संपूर्णतः निःशुल्क असेल.
4) शिबिरामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी खालील लिंकमध्ये आपली माहिती भरा.
https://employment.pritamjmhatre.com/reg/
Post a Comment