News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

निवडणूक कालावधीत नवी मुंबई पोलिसांकडून २ कोटी ९ लाखांची रोकड जप्त ... अंमली पदार्थ,बेकायदा मद्य विक्री,बेकायदा शस्त्र बाळगण्यांवर धडक कारवाई

निवडणूक कालावधीत नवी मुंबई पोलिसांकडून २ कोटी ९ लाखांची रोकड जप्त ... अंमली पदार्थ,बेकायदा मद्य विक्री,बेकायदा शस्त्र बाळगण्यांवर धडक कारवाई

पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नियुक्त करण्यात आलेल्या फिरते निगराणी पथक व स्थिर देखरेख पथकाने गत दिड महिन्यामध्ये बेकायदेशीररीत्या वाहनातून नेली जाणारी तब्बल 2 कोटी 9 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे,बेकायदा मद्य बाळगणारे व विकणारे, तसेच बेकायदा शस्त्र बाळगणारे व विक्री करणाऱ्यावर  धडक कारवाई केली आहे.  

 या निवडणुकीच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.निवडणूक आयोगाकडून लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच आचारसंहीतेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडुन विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 12 फिरते निगराणी पथक (एफएसटी) तसेच 14 स्थिर देखरेख पथक (एसएसटी) नियुक्त करण्यात आले आहेत.  

या पथकाच्या माध्यमातुन बेकायदा नेली जाणारी मोठी रोकड,अंमली पदार्थ,अवैध मद्यसाठा आणि मद्याची वाहतूक करणार्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या पथकाने गत 16 मार्च ते 7 मे या कालावधीत स्थिर देखरेख पथकाने 6 कारवायांमध्ये तब्बल 2 कोटी 9 लाख 10 हजाराची रक्कम पकडली आहे. यात नुकतीच ऐरोली येथे रिक्षातून नेली जाणारी तब्बल 1 कोटी 60 लाखाची रोकड पकडलेल्या रक्कमेचा देखील समावेश आहे.  अमली पदार्थ विरोधी कारवाई  नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक व पोलीस ठाणे स्तरावर अंमली पदार्थाची तस्करी व सेवन करणार्यांविरोधात देखील मोठी कारवाई केली असून आचारसंहीता लागू झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत अमली पदार्थ तस्करीच्या 28 कारवाया केल्या आहेत. यात 1 कोटी 88 लाख 70 हजार रुपये किंमतीचे 2076 ग्रॅम वजनाचे कोकेन, 61 लाख 63 हजार 780 रुपये किंमतीचे 598.45 ग्रॅम एमडी तसेच 55 लाख 68 हजार रुपये किंमतीचे 1856 ग्रॅम वजनाचे चरस, 9 लाख 50 हजार 755 रुपये किंमतीचा 56 किलो 187 ग्रॅम वजनाचा गांजा, तर 9 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 1.24 ग्रॅम एलएसडी हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.  

बेकायदा शस्त्र जप्तीची कारवाई  नवी मुंबई पोलिसांनी निवडणुक आचारसंहितेच्या काळात अवैध शस्र बाळगणार्याची देखील पोलिसांनी धरपकड केली असून अतापर्यंत पोलिसांनी अवैध शस्र बाळगणार्याविरोधात 36 गुन्हे दाखल करुन वेगवेगळ्या प्रकारचे 37 शस्र जप्त केले आहेत. यात पिस्टल, गावठी कट्टा व रिव्हॉल्वर -9 तसेच 25 जिवंत काडतुस जप्त केले आहेत. त्याचप्रमाणे तलवार, चॉपर, सुरा,चाकू या सारखी 28 हत्यारे जप्त केली आहेत. बेकायदा मद्यविक्रेत्यांवर कारवाई  निवडणुकीच्या काळात दारुची मोठया प्रमाणात अवैध विक्री केली जाते. दारुच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरु आहेत.आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन दारु विक्रेत्यांवर तसेच गावठी हातभट्टीची दारु गाळणार्यावर 193 कारवाया केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी छापेमारी करुन 4 लाख 87 हजार 468 रुपये किंमतीची 4220.38 लिटर दारु जप्त केली आहे. त्याचप्रमाणे गुटखा व पानमसाला विक्री व वाहतूक करणार्याविरोधात 9 कारवाया करुन 32 लाख 26 हजार 596 रुपये किंमतीचे 10,605 गुटख्याचे पाऊच  जप्त केले आहेत.  

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment