News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

३ दिवसांचा ड्राय डे ....दारू घेण्यासाठी झाली तळीरामांची धावाधाव .... बार रेस्टॉरंट बंद ठेवण्यास पनवेलच्या बारमालकांची पसंती

३ दिवसांचा ड्राय डे ....दारू घेण्यासाठी झाली तळीरामांची धावाधाव .... बार रेस्टॉरंट बंद ठेवण्यास पनवेलच्या बारमालकांची पसंती

पनवेल- मावळ लोकसभेची सोमवार १३ मे २०२४ रोजी निवडणूक होत आहे,या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तीन दिवसाचा ड्रायडे (दारूबंदी) राहणार आहे.

काल सायंकाळपासूनच ड्रायडेला सुरुवात झाली आहे.शनिवार संध्याकाळपासून रविवार पूर्ण दिवस आणि सोमवारी सायंकाळपर्यंत ड्रायडेचा कालावधी असून सोमवारी मतदानाचा कालावधी संपल्यानंतर अर्थातच सायंकाळनंतर वाईन शॉप,बार रेस्टॉरंट सुरू होतील.काल सायंकाळी वाईनशॉप बंद होणार असल्याचे तळीरामानां कळताच त्यांची दारू घेण्यासाठी धावाधाव सुरू झाली.तीन दिवसांचा ड्रायडे असल्याने तळीरामांची दारूची पंचाईत होणार,ती होऊ नये म्हणून त्यामुळे काही वाईन शॉपवर गर्दी झाली.निवडणूक शांततेत पार पडावी ही प्रशासनाची नेहमीच भूमिका राहिली आहे.त्यासाठी त्यांना सर्वांचेच सहकार्य मिळते.पनवेलमधील बार रेस्टॉरंट बंद ठेवण्यास बारमालकांनी प्राधान्य दिले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment