News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बनावट नोटा छापणा़र्‍या तरुणाला गुन्हे शाखेने केली अटक ... यु ट्युब पाहून घरातच बनावट नोटा छापत असल्याचे उघड ... पनवेल जवळील तोंडरे गावातील तरुण

बनावट नोटा छापणा़र्‍या तरुणाला गुन्हे शाखेने केली अटक ... यु ट्युब पाहून घरातच बनावट नोटा छापत असल्याचे उघड ... पनवेल जवळील तोंडरे गावातील तरुण

पनवेल,  दि. 17 (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणा़र्‍या एका तरुणाला अटक केली आहे.प्रफुल्ल गोविंद पाटील (26) असे या आरोपीचे नाव असून त्याने यु ट्युबवर पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे.पोलिसांनी त्याच्या घरातून 2 लाख 3 हजार रुपये किमंतीच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.  
या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी प्रफुल्ल गोविंद पाटील हा तळोजा एमआयडीसीतील तोंडरे गावात राहत होता तसेच तो घरामध्येच कॉम्प्यूटर व प्रिंटरद्वारे बनावट नोटा तयार करुन त्या नोटा आपल्या एजंटमार्फत बाजारात चलनात आणत होता.याबाबतची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम व त्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी तोंडरे गावातील आरोपी राहत असलेल्या घरावर छापा मारला.  

यावेळी आरोपी प्रफुल्ल पाटील हा कॉम्प्यूटर व प्रिंटरद्वारे घरामध्येच नोटा छापत असल्याचे आढळून आले. त्यानंतर गुन्हे शाखेने सदर घरामध्ये 2 लाख 3 हजार 200 रुपयांच्या 50, 100 आणि 200 रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. मागील तीन चार महिन्यापासून प्रफुल्ल पाटील याने अशा पद्धतीने बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत किती बनावट नोटा बाजारात आणल्या याबाबत पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.  

9 वी नापास असलेल्या आरोपीने युटयुबवरुन घेतले नोटा छापण्याचे प्रशिक्षण आरोपी प्रफुल्ल पाटील हा नववी नापास आहे. काही दिवसापुर्वी दिल्लीमध्ये कॉम्प्युटर प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छापणा़र्‍याची माहिती त्याला युट्युबवर मिळाली होती. त्यानंतर प्रफुल्ल पाटील याने युटयुबवर नोटा कशा छापायच्या याचे प्रशिक्षण घेऊन त्यानुसार त्याने तळोजा येथील आपल्या घरामध्ये बनावट नोटा छापण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळून आले आहे.  
एकूण 2 लाख 3 हजाराच्या बनावट नोटा जप्त
या कारवाईत पोलिसांनी 50, 100 आणि 200 रुपयांच्या 2 लाख 3 हजार 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यासोबतच नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर्स,स्कॅनर्स,कलर्स,कॉम्प्युटर असा सुमारे 3 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.  

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment