वाढदिवसानिमित्त माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ... सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस
पनवेल (प्रतिनिधी) हसतमुख स्वभाव, सर्वांना बरोबर घेवून काम करणारे व्यक्तीमत्त्व, राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्व देणारे,सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा आदी भरगच्च क्षेत्र असे संतुलन साधत आपल्या व्यक्तीमत्वाने अल्पावधीत मोठे यश संपादन करून समाजामध्ये नावलौकीक प्राप्त करणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे आज वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतकांनी अभिष्टचिंतन केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा राजकीय व सामाजिक कतॄत्वाचा वसा अंगी बाळगत सामाजिक, कला, क्रीडा तसेच राजकारण व उद्योजकता क्षेत्रात यशाची अनेक शिखरे परेश ठाकूर यांनी पादाक्रांत केली आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची दानशूरवॄत्ती, आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन परेश ठाकूर यांना नेहमी प्रेरक ठरले. तारूण्यातील सळसळते रक्त उत्साह समाजाच्या सेवेत खर्ची घालत त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली असून युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता रुजविण्यासाठी त्यांनी तरुणांची मजबूत फळी तयार केली आहे. युवकांचे आदर्श स्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
युवा कार्यकर्ता ते पनवेल महापालिकेचे सभागॄह नेते म्हणून त्यांनी जबाबदारीने काम करत असताना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स, अशा विविध संस्था- संघटना माध्यमातून राबविल्या जाणारे सामाजिक उपक्रम, मेळावे, पक्षबांधणी त्याचबरोबर विविध कार्यक्रमात परेश ठाकूर यांचे कार्य उल्लेखनीय असे आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना सर्वांना बरोबर घेउन जाण्याच्या त्यांच्या वॄतीमुळेच ते सर्वामध्ये लोकप्रिय झाले. सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांशी जोडली गेलेली नाळ हा त्यांचा आत्मा राहिला आहे, त्यामुळे विविध संस्था, संघटना, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.
Post a Comment