News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलच्या ओरायन मॉलच्या शॉप अँड विन स्पर्धेतील महापुरस्काराचे दुर्वेश विरेकर आणि जयंता दास मानकरी .... परदेशातील ब्रँड वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणजे ओरायन मॉल-अभिनेत्री केतकी माटेगावकर

पनवेलच्या ओरायन मॉलच्या शॉप अँड विन स्पर्धेतील महापुरस्काराचे दुर्वेश विरेकर आणि जयंता दास मानकरी .... परदेशातील ब्रँड वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणजे ओरायन मॉल-अभिनेत्री केतकी माटेगावकर

पनवेल - परदेशात जाऊन डॉलरमध्ये खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांना मनापासून खरेदी करता येणारे परदेशातील विविध वस्तूंचे ब्रँड पनवेलच्या ओरायन मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत,त्यासाठी बाहेर जायची गरज नाही,अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने पनवेलच्या ओरायन मॉलच्या आठव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी दिली.याप्रसंगी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर,दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर उपस्थित होते.
पनवेमधील सुप्रसिद्ध ओरायन मॉलच्या आठव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ओरायन मॉलतर्फे ग्राहकांसाठी शॉप अँड विन स्पर्धा आयोजित केली होती.या समारंभात लकी ड्रॉ द्वारे सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते सोडत काढण्यात आली,त्यामध्ये प्रथम दुर्वेश विरेकर तर द्वितीय जयंता दास हे शॉप अँड विन महापुरस्काराचे मानकरी ठरले.विजेत्यांना ब्लूस्टोनतर्फे सोन्याचे दागिने तसेच लेकेॲम्प् तर्फे ई बाईक बक्षीस मिळणार आहे,या समारंभासाठी महिला आणि तरुणाईची मोठी गर्दी होती.यावेळी केतकीने,मला वेड लागले प्रेमाचे... हे गाणे गायले,ग्राहकांमधील राजश्री यादव ही तिच्यासोबत गाणे गाण्यासाठी होती.केतकी माटेगावकर हिने हे गाणे गाऊन पनवेलकरांना अक्षरशः वेडावून सोडले.
यापुढे बोलताना किती माटेगावकर म्हणाली,मॉलतर्फे होत असलेल्या अशा स्पर्धांमुळे ग्राहकांची जवळीकता निर्माण होते,संवाद होतो.ग्राहक यांनी केलेल्या खरेदीवर त्यांना लकी ड्रॉद्वारे दिली जाणाऱी बक्षीसे ही व्यवस्थापनाची कल्पना चांगली असून लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहेत हे लक्षात घेऊन मंगेश परुळेकर यांनी ओरायन मॉलची उभारणी केली.ही अतिशय छान उभारणी केली आहे.या मॉलमध्ये अगदी सहज उपलब्ध होतील असे बाजारातील देशी-विदेशी वस्तूंचे ब्रँड एका चांगल्या वातावरणामध्ये उपलब्ध आहेत ही पनवेलकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे,असे तिने शेवटी सांगितले. अभिनेत्री केतकी माटेगावकर हिला ओरायन मॉलतर्फे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.या स्पर्धेकरता बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष सहकार्य लाभले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment