पनवेल शहरातील दोन दुकानांना आज सकाळी भीषण आग ; लाखोंचे नुकसान
पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरातील टपाल नाका एम जी रोड येथील 2 दुकानांना आज सकाळी अचानकपणे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
शहरातील एम जी रोड येथील हुसेनी ट्रेंड्स या दुकानाला आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक पणे आग लागली. याबाबतची माहिती दुकान मालकाला परिसरातील नागरिकांनी कळविली तसेच पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाला व पनवेल शहर पोलीस ठाण्याला कळविण्यात आले.दरम्यान ही आग आतून पसरत बाजूला असलेल्या बुऱ्हानी ट्रेंड्स या दुकानाला सुद्धा आग लागली.अग्निशमन दलाच्या दोन बबांनी शर्तींचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयाच्या मालाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Post a Comment