स्व:नामाचा जप देणाऱ्या स्वयंभू गुरुचीं प्रथा-डॉ. सच्चिदानंद शेवडे ....नवीन पनवेल येथे अत्रे कट्ट्यातर्फे गुरु कसा असावा व्याख्यान संपन्न
पनवेल- समाजात स्व:नामाचा जप देणाऱ्या स्वयंभू गुरुचीं प्रथा आली आहे पण ते खऱ्या अर्थाने खरे गुरु नाहीत असे प्रतिपादन डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी,नवीन पनवेल येथे अत्रे कट्ट्यातर्फे गुरु कसा असावा या विषयावरील व्याख्यानाच्यावेळी केले.
यापुढे बोलताना म्हणाले,ब्रम्हाचं ज्ञान देणारे ते गुरू म्हणून गरुर्साक्षात परब्रह्म असं आपण म्हणतो.गुरूच्या चांगल्या वागण्यातून संस्कारित झालेला शिष्यच अधिकारी बनतो.गुरू हा मोक्षाचा पथदर्शक असतो हे खरे असले तरी परंपरा असलेलाच खरा गुरू असतो.
आज मोक्षा करता गुरू कोणालाच नको असतो. प्रापंचिक अडचणी सोडविण्यासाठी गुरू आहे.
दासबोध,मनोबोध,ज्ञानेश्वरी,मनाचे श्लोक असे ग्रंथ म्हातारपणी वाचायचे असतात.तीर्थयात्रा देखील म्हातारपणीच करायच्या असतात ही चुकीची प्रथा असून तरुणपणातच हे वाचन करून तीर्थाटन देखील तरुणपणातच करावे असा सल्ला त्यांनी दिला.
आपल्या व्याख्यानात त्यांनी,धर्म,श्रद्धा,अंधश्रद्धा, विश्वास,मराठीत आजकाल वापरले जाणारे चुकीचे शब्द यांचादेखील उहापोह डॉ.शेवडे यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत अत्रे कट्ट्याचे अरविंद करपे यांनी केले.
Post a Comment