लोकसभा निवडणुकीत पनवेलच्या मतदारांची मतदार यादीतून नावे गहाळ ...या गंभीर विषयाकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या अपूर्वा प्रभू यांचे तहसीलदारांना निवेदन
पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक मतदान केंद्रावर मतदारयादीतून पनवेलच्या मतदारांची नावे गहाळ झाली असून याकडे लवकरात-लवकर गांभीर्याने लक्ष द्यावे असे निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नवीन पनवेलच्या महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी पनवेलचे तहसीलदार यांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात, मतदारांनी वेगवेगळ्या पक्षांकडे यादी तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील यादीत नावे शोधण्याचा प्रयत्न केला तसेच वेगवेगळ्या मतदान केंद्रावरही जाऊन चौकशी केली पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. मतदार ओळखपत्र आहे पण मतदार यादीत नाव नाही,अशी परिस्थिती झाली.त्यामुळे शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.मतदार रत्नागिरी, डोंबिवली,अंधेरी असे दुरून मतदान करण्यासाठी आले आणि यादीतून नावेच गहाळ झालेली पाहून मतदारांमध्ये आपल्याला हक्क बजावता येणार नाही म्हणून दुःख आणि संताप अशा मिश्र भावना दिसून आल्या.
नवीन पनवेलमधील अनेक मतदान केंद्रावर नागरिकांच्या तक्रारी होत्या.निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्रातील एमटी मालिकेतील अनेक मतदारांची नावे गहाळ झाल्याच्या तक्रारी आहेत.2014 ला ज्यानीं मतदान नोंदणी केली त्यांना मिळालेल्या ओळखपत्राचा क्रमांक आहे अशी बरीच नावे मतदारयादीत नाहीत.शिवाय मतदार जिथे राहतात त्या शहरात नावे न येता दुसऱ्या शहरात आणि ग्रामीण विभागात नावे असल्याचे आढळले.हे अशा गैरकारभारामुळे उद्या येणाऱ्या महानगरपालिका मतदानात उमेदवारांना याचा फटका बसणार,तेव्हा गंभीर बाबीची दखल घेण्यात यावी आणि संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क मतदारांकडून काढून घेऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे,शिवाय सरकारद्वारे मतदान नोंदणी किंवा तपासणीसाठी येणारे कर्मचारी मराठी-इंग्रजी व्यवस्थित लिहू, वाचू शकतात का नाही याची पडताळणी करावी.नाव,पत्ता लिहिताना प्रचंड चुका आढळून आले आहेत आणि हे देखील एक कारण आहे की लोकांनी मतदान यादीत नावे न सापडण्याची.तरी कृपया लवकरात-लवकर या बाबीकडे गंभीरतेने लक्ष घालावे अशी विनंती करण्यात आली आहे.
Post a Comment