पनवेल महानगरातील होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करा- काँग्रेसच्या निर्मला म्हात्रे यांची मागणी
पनवेल- मुंबई होल्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये अशी दुर्घटना होऊ नये म्हणून पनवेल महानगरातील होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करा अशी मागणी पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निर्मला म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे तसेच इमारतीवरील शेड व मोबाईल टॉवर संदर्भात सर्वेक्षण करावे अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी दिलेल्या निवेदनात, मुंबईमध्ये वादळी पावसामुळे जे काही वित्तीय आणि मनुष्यहानी झाली आहे.वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होल्डिंग असतील किंवा इमारती मटेरियल असेल त्यामुळे सामान्य नागरिकांना आपले प्राण आणि वित्तीय नुकसान भोगावे लागलेले आहे.पनवेल महापालिका ही राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या तसेच भविष्यातील विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी महापालिका आहे.पनवेल तसेच पनवेलमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येतात कारण फार मोठ्या प्रमाणात व्यापारी बाजारपेठ पनवेलमध्ये आहे,त्याच अनुषंगाने आपल्या उद्योगाचा किंवा आपल्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात जाहिरातीद्वारे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून मोठी मोठी होर्डिंग लावली जातात तसेच पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरणाच्या माध्यमातून इमारती निर्माण करण्यात येत आहेत,त्याच अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती आपल्या इमारतीच्या संदर्भात माहिती फलक हे ही मोठ्या प्रमाणात सर्वत्र लावतात तसेच महापालिकेच्या क्षेत्रात मोठे-मोठे होल्डिंग हे जाहिराती फलक लावण्यासाठी भाडेतत्त्वावरती देण्यात येतात.भविष्यात कोणत्याही प्रकारे नागरिकांचे नुकसान अथवा इजा होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने संबंधित जाहिराती फलकांसाठी नियम तयार करून तसेच जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला होल्डिंगच्या देखभाल संदर्भात सक्त ताकीद किंवा सूचना देण्यात यावी तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे असे निवेदन पत्र देण्यात आले.
Post a Comment