News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

राहत्या घरातून पनवेलच्या बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेला तरुण परतलाच नाही

राहत्या घरातून पनवेलच्या बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेला तरुण परतलाच नाही

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः राहत्या घरातून बारामती सहकारी बँक पनवेल येथे पैसे भरण्यासाठी जातो असे सांगून एक तरुण घराबाहेर पडला तो अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.आदर्श अजयकुमार बच्चन (19 रा.पेठगाव, कोळखे) असे या तरुणाचे नाव असून अंगाने सडपातळ, रंग गोरा, उंची 5 फुट 8 इंच, डोक्याचे केस काळे मध्यम वाढलेले, दाढी मिशी बारीक, डोेळे काळे मोठे असून त्याच्या अंगात लालसर (मरुण रंगाचा) हाफ बाह्याचा टी शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट तसेच पायात सॅण्डल घातलेली आहेे.त्याला हिंदी, मराठी व इंग्रजी भाषा अवगत आहे.त्याच्यासोबत मोबाईल फोन आहेे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी क्र.022-27452333 किंवा पोलीस नाईक अतुल देवकर मो.नं.8169406069 यांच्याशी संपर्क साधावा.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment