बुध्दपौर्णिमेनिमित्त पनवेल महापालिकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांची उपस्थिती ...लोकसहभागातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण
पनवेल,दि.२३ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महापालिकेने लोकसहभागातून विविध स्पर्धांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी केली होती.आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेतील विजेत्यांना बुद्धपर्णिमेनिमित्ताने आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सनमानीत करण्यात आले.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे,माजी उपमहापौर जगदीश गायकवाड,माजी नगरसेवक अनिल भगत,प्रकाश बिनेदार,शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, सामान्य प्रशासन विभागप्रमुख दशरथ भंडारी, महापालिका अधिकारी अनिल कोकरे,शैलेश गायकवाड,किर्ती महाजन,नामदेव पिचड,महापालिका शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी, बहुजन पंचायत समिती १ चे सदस्य अनिल जाधव,महेश साळुंखे,नरेंद्र गायकवाड,भांडारपाल प्रकाश गायकवाड,विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक ,नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकांध्ये उपायुक्त कैलास गावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महापालिकेच्यावतीने यावर्षी घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धांना महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी सहभागी झाल्याबद्दल आभार मानले तसेच पुढील वर्षी यावर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेंचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीसाठी देणगी दिलेल्या देणगीदारांचे सत्कार करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते चित्ररथ,निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते .....
१. समीक्षा वाढवणे
२.दिक्षा पाटील
३.प्रतिक पवार
४.मुदित मिश्रा
५.संदिप दिवे
निबंध स्पर्धेतील विजेते ....
१.सिमरन शर्मा
२.आर्या धनावडे
3.प्रेमनाथ पाटील
४.निहिरा चोलंगी
५.मानव पटेल
Post a Comment