नवीन पनवेलमध्ये भीम जयंती महोत्सव ..माजी नगरसेवक ऍड. प्रकाश बिनेदार यांच्यातर्फे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती २०२४ नवीन पनवेल यांच्यातर्फे १३, १४ आणि १५ एप्रिल २०२४ रोजी भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर,भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, परेश ठाकूर यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नवीन पनवेल मधील सेक्टर २ येथील सिडको क्रीडांगण येथे हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. १३ एप्रिल रोजी महिंला मंडळाच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहेत. १४ एप्रिल रोजी वेशभूषा लहान मुले, महिला आणि पुरुषाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि सायंकाळी ०६ वाजता आनंद शिंदे आणि पार्टी यांच्या शिंदेशाही बाणा हा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर १५ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक माता पितांचा सन्मान समारंभ होणार आहे. या सोहळ्याचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन महोत्सवाचे आयोजक भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक ऍड. प्रकाश बिनेदार यांनी केले आहे.
Post a Comment