पनवेल महापालिकेच्या २३ आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये उष्माघात नियंत्रण कक्षाची उभारणी ... उष्माघात नियंत्रण कक्षाची आयुक्तांकडून पहाणी
पनवेल : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढू लागल्याने. उष्माघात होण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या 23 आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये उष्माघात नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी आज या उष्माघात नियंत्रण कक्षाची पहाणी करून आरोग्य वर्धिनी केंद्रातील विविध सेवासुविधांची आढावा घेतला.
गेल्या काही दिवसापासून राज्यातील तापमान वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढून उष्माघात होण्याची शक्यता असते. राज्य शासनाकडील आपत्ती व्यवस्थापनाने देखील उष्माघाताच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानूसार महानगरपालिकेच्यावतीने उष्माघाताच्या रूग्णांसाठी खबरदारी म्हणून 9 आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये उष्माघात नियंत्रण कक्षांतर्गत वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे तसेच उर्वरीत 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन आपला दवाखना व 6 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रामध्ये उष्माघात नियंत्रण कक्षांतर्गत एअर कुलर बसविण्यात आले आहेत.याचबरोबर सर्व आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिका सुविधा देण्यात आली आहे.उष्माघात नियंत्रण कक्षांमुळे रूग्णांना बाहेरील तापमानापेक्षा कमी तापमानात ठेवून तात्पुरता दिलासा मिळू शकणार आहे. याचबरोबर कोल्ड स्पजिंग व उष्णतेमुळे त्रास होणाऱ्या रूग्णांसाठी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ओआरएस कॉर्नर तयार करण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर नागरी प्राथमिकआरोग्य केंद्र खारघर 5 व तळोजा फेज 2 येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील उष्माघात नियंत्रण कक्षाची पहाणी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी केली.यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ.आकाश ठसाळे, त्या त्या ओराग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला. महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. याबाबत संबधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
Post a Comment