News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार ... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील बड्या नेत्यांची उपस्थिती

मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार ... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील बड्या नेत्यांची उपस्थिती

पनवेल- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे-रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आज सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

त्यानिमित्ताने सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता खंडोबा माळ येथून पीएमआरडी ऑफिस प्राधिकरणापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

तुमच्या साथीने अर्ज भरणार,पुन्हा एकदा महाविजय होणार.मावळच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयाची पायाभरणी करताना तुम्हा सर्वांचा आशीर्वाद लाख-मोलाचा आहे.तेव्हा या रॅलीत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आपण मला लोकसभा विजयासाठी आशीर्वाद द्यावा,असे आवाहन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment