पनवेलचे उबाठा गटाचे उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश ...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश
मुंबई :- पनवेलमधील उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, शिव वाहतूक सेनेचे उबाठाचे शहराध्यक्ष नितीन कसाबे यांनी आज त्यांच्या रुग्णवाहिकेसह शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शैलेश जगनाडे आणि नितीन कसाबे हे उबाठा गटाचे पदाधिकारी गेली 12 वर्षांपासून त्या गटाचे काम एकनिष्ठपणे करत होते. विभागातील रुग्णांना 24 तास सेवा मिळावी यासाठी त्यांनी 16 लाख रुपये खर्च करून एक रुग्णवाहिका घेतली. ही रुग्णवाहिका पक्षाला देऊन त्याद्वारे सामाजिक काम करण्याची त्यांची इच्छा होती. 4 मार्च रोजी उबाठा गटाचे पक्षप्रमुख पनवेलमध्ये दौऱ्यासाठी आले असता यांच्याहस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र पक्ष पदाधिकाऱ्यांची एवढी साधी इच्छाही पूर्ण करावी असे त्याना वाटले नाही. उलट साहेब काही तुमच्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करणार नाहीत असे उत्तर त्याना देण्यात आले. त्यामुळे अखेर नाराज झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख ऍड. प्रथमेश सोमण यांच्याशी संपर्क करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत तर केलेच, पण त्यासोबतच त्यांनी सोबत आणलेल्या रुग्णवाहिकेचे नारळ फोडून लोकार्पण देखील केले तसेच निस्वार्थी भावनेने जनसेवेसाठी काम करणाऱ्या या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली.
या पक्षप्रवेशावेळी खासदार राहुल शेवाळे,आमदार प्रा. मनीषा कायंदे, उपनेते विजय नहाटा,शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, सुशांत शेलार,उपनेत्या कला शिंदे,विभागप्रमुख संध्या वढावकर,पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे,महानगरप्रमुख ऍड.प्रथमेश सोमण,शहरप्रमुख प्रसाद सोनवणे आदी उपस्थित होते.
Post a Comment