News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली असून मावळ लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनाच विजयी करा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर

शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली असून मावळ लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनाच विजयी करा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर

पनवेल  (संजय कदम):  शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली असून मावळ लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनाच विजयी करा असे आवाहन आज पनवेल तालुक्यातील नावडे शहर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी शिवसेना उपनेते,आमदार सचिन अहिर यांनी केले.

 यावेळी शिवसेना उपनेते ,आमदार सचिन अहिर यांच्यासह जिल्हाप्रमुख शिरीष घरत,मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील,उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, कार्यक्रमाचे आयोजक नावडे विभागीय अध्यक्ष यशवंत खानावकर,शाखा प्रमुख विलास म्हात्रे, विधानसभा संघटक दीपक निकम,विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल,महानगर समन्वयक दिपक घरत, उप महानगर प्रमुख रामदास गोंधळी, युवासेना सह सचिव अवचित राऊत, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ,विधानसभा संघटिका सुजाता कदम,कामोठे शहर संघटिका संगीत राऊत, संपदा धोंगडे,सीमा पाटील, जयश्री म्हात्रे,शीतल म्हात्रे,सविता म्हात्रे,वर्ष पाटील, शाखा प्रमुख गणेश म्हात्रे, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर,अशोक खानावकर,हरेश पाटील,प्रदीप केणी,विश्वनाथ खानावकर,राम खानावकर,अनंत शेठ म्हात्रे, प्रमोद पाटील,तात्या महानवर, सचिन भोईर,संदीप तांडेल,अक्षय साळुंखे,वासुदेव पाटील,बेंदर पाटील, यांसह परिसरातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की,नावडे हा परिसर विकसित होत असून येथील अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसेना बांधील असल्याचे सांगिलते तर मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगिलते की,शिवसेनेची शाखा ही न्यायमंदिर असून येथे येणारी प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे काम येथील पदाधिकारी करतील असे आश्वासित केले.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment