जागतिक ग्राहक दिनानिमित्त आज पनवेलमध्ये ग्राहक हक्क व कर्तव्ये विषयावर व्याख्यानाचे आयोजन .... पनवेल-उरण आगरी समाज मंडळ व जनजागृती ग्राहक मंच रायगड,पनवेल शाखेचा यांचा उपक्रम
पनवेल- जागतिक ग्राहक दिनानिमित्त आज पनवेलमध्ये ग्राहक हक्क व कर्तव्ये विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रमुख व्याख्याता शैलेजा आपटे यांचे मार्गदर्शन या व्याख्यानामध्ये लाभणार आहे.
पनवेल-उरण आगरी समाज मंडळ व जनजागृती ग्राहक मंच रायगड,पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १५ मार्च २०२४ सायंकाळी ५ वाजता आगरी समाज हॉल (महात्मा ज्योतिबा फुले सभागृह) पनवेल येथे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील व जनजागृती ग्राहक मंच रायगड,पनवेल शाखेचे अध्यक्ष के.एल.जाधव यांनी केले आहे.
Post a Comment